गोविंद विष्णू महाजन विद्यालयात सामाजिक न्याय दिन कार्यक्रम
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर दि.२६ जून छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत स्थानिक गोविंद विष्णू महाजन विद्यालयात सामाजिक न्याय दिनानिमीत्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये प्राचार्य एम.पी कुयटे यांच्या सह अन्य शिक्षक बंधू-भगिनिंनी उपस्थित होते.
सुरुवातीला राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पुढे आपल्या मनोगतात बोलतांना प्राचार्य कुयटे यांनी शाहू महाराजांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे सध्याच्या काळातील महत्व स्पष्ट करून सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन प्रा.डाॅ नितीन भुजबळ यांनी तर आभार प्रदर्शन एन.एल.धनगर यांनी केले.