Breaking News
recent

सफाई कामगार संघटनेच्या बेमुदत उपोषणाला "समतेचे निळे वादळ" संघटनेचा जाहीर पाठींबा!



नागेश सुरंगे प्रतिनिधी

मलकापूरः(८) येथील सफाई कामगार संघटनेच्या वतीने श्री गोकुल मोहन रानवे व अशोक गुलाब ढोलकर यांनी मलकापूर नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत उपोषण चालविले आहे.सदर उपोषणाची कोणत्याही प्रकारे अद्याप पर्यत दखल घेण्यात आली नसल्यामुळे सफाई कामगारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या बाबतीत आज रात्री "समतेचे निळे वादळ" या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगर सेवक भाई अशांत वानखेडे यांनी उपोषण मंडपाला आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली.बेमुदत उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्याशी समर्पक बोलणी देखील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी यावेळी भाई अशांत वानखेडे यांना सांगितले या बाबीची गंभीर दखल घेत वानखेडे यांनी लिखित स्वरूपात उपोषणकर्त्यांनी चालविलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा देत त्यांच्या रास्त व न्यायपूर्ण मागण्याचे समर्थन केले.सफाई कामगारांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन मागण्यांची पूर्तता न केल्यास आम्हाला तिव्र आंदोलन करावे लागेल व त्यासाठी रस्त्यावर उतरण्यास आमची संघटना मागेपुढे पाहणार नाही असा गंभीर इशारा "समतेचे निळे वादळ" या सामाजिक संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.

*अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने उपोषणास जाहीर पाठींबा !*

सदर प्रसंगी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने उपोषणाची दखल घेत उपोषणकर्त्यांनी चालविलेल्या आंदोलनाला संघटनेचे मलकापूर शहर अध्यक्ष श्री डी.के.टाक व पद अधिकारी यांनी जाहीर पाठींबा देत रस्त्यावर आंदोलनाची तयारी दर्शविली.

सर्वच मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही ! आणखी आंदोलन तिव्र करणार !

संपूर्ण मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय बेमुदत उपोषणातून माघार घेणार नसल्याचा निर्णय अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या वतीने उपोषणकर्ते गोकुल रानवे व अशोक ढोलकर यांनी सदर प्रसंगी घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.उपोषणकर्त्यांना समर्थन म्हणून आणखी दोन पदाधिकारी बेमुदत उपोषणास बसणार असल्याची घोषणा श्री हुकुमचंद ढंडोरे यांनी यावेळी केली.

यावेळी सर्व श्री मोहनभाई खराटे,दिलीपभाऊ इंगळे,राजेश रायपूरे,दत्तू पहेलवान,गोकुल मोहन रानवे,अशोक गुलाब ढोलकर,राजेश जाझोट,हुकुमचंद ढंडोरे,रमेश जाझोट,गणेशकाका टाक,संतोष चंडाले,मानसिंग सारसर,धनंराज ढोलकर,राजू डागोर,गिरधारी जाझोट,दिलीप टाक,विशाल टाक,महादेव टुनलाईट,सुरेश सारसर,विशाल सारसर,गोलू सारसर,प्रल्हाद टाक,सुनील ढोलकर,किशोर ढोलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Powered by Blogger.