Breaking News
recent

श्री गजानन महाराज संस्थानचे रुग्णालय रुग्णसेवेत रुजू

 


प्रतिनिधी नागेश सुरंगे

   शेगाव श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव व्दारा संचालित वैद्यकीय सेवाकार्यांतर्गत अॅलोपॅथीक, आयुर्वेदिक होमियोपॅथीक व रूग्णालय, दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामीण आरोग्य सेवा योजना या सर्व मंदिर परिसरातील उपक्रमांतर्गत सेवांचे ०९ जून, गुरुवार रोजी खामगांव रोड स्थित नव्या रुग्णालयाचे इमारतीमध्ये स्थानांतरण होवून रूग्णालय रूग्णसेवेत रूजू झालेले आहे.

  श्री रुग्णालयात क्षयरोग चिकित्सा, जनरल फिजीशियन चिकित्सा, जनरल सर्जन चिकित्सा अस्थिरोग चिकित्सा, चर्मरोग चिकित्सा, मनोविकार चिकित्सा, बालरोग चिकित्सा, कान, नाक, घसा चिकित्सा, नेत्ररोग चिकित्सा, स्त्रिरोग चिकित्सा, कर्करोग चिकित्सा, छातीविकार चिकित्सा, दंतरोग चिकित्सा, हृदयविकार चिकित्सा, न्युरोफिजीशियन चिकित्सा, मधुमेह विकार चिकित्सा, मुत्रविकार चिकित्सा, फिजीओथेरेपी चिकित्सा, आयुर्वेद खिरोग चिकित्सा, आयुर्वेदिक चिकित्सा, होमियोपॅथीक क्षयरोग चिकित्सा वैद्यकीय जनरल तपासणी(ओ.पी.डी.) ग्रामीण आरोग्य सेवा केंद्र, रूग्णवाहिका सुविधा इ. सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व उपचार सुविधेसाठी श्री संस्थेच्या अधिकृत मानसेवी डॉक्टरांसह विविध चिकित्सा पध्दतीचे मानसेवी तज्ञ डॉक्टर निर्धारीत दिवशी व ठरलेल्या वेळेत या रूग्णालयात उपलब्ध असतील. तरी गोरगरीब, गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीकरीता रूग्णालयाशी संपर्क करावा, असे आवाहन श्री संस्थानकडून आहे करण्यात आले


Powered by Blogger.