Breaking News
recent

जालना जवळ झालेल्या अपघातात मेहकर येथील एक जण ठार दोन गंभीर जखमी

 



प्रतिनिधी नागेश सुरंगे

समृद्धी महामार्ग वर जालना जवळ अपघात होऊन एक जण ठार तर दोन दर गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 12 जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये जानेफळ येथील सुवर्ण शीला ज्वेलर्सचे मालक सुनील निंबेकर, चंदू भाऊ सावळे, हे गंभीर जखमी झाले आहे. तर मेहकर येथील हॉटेल व्यवसायिक बळीराम खोकले (52) यांचा मृत्यू झाला. अपघातातील व्यक्ती हुंदाई कार एम एच 28 बी. के 3100 ने जालना वरून मेहकर कडे येत असताना कारचे टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जखमींना जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



Powered by Blogger.