Breaking News
recent

वटपौर्णिमेनिमित्त 'परिणीता वृक्षारोपण कार्यक्रम' उत्साहात संपन्न

 


संतोष आमले  पनवेल (प्रतिनिधी)

   वटपौर्णिमे निमित्ताने आज खारघर नवी मुंबई येथे परिणीता सोशल फाऊंडेशनच्या वतीने परिणीता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील अनेक परिणीता मैत्रिणी उपस्थित होत्या. सर्वांनी एकत्र येत खारघर ड्रायव्हिंग रेंज या ठिकानी वृक्षारोपण केलं. वृक्षारोपण करण्यासाठी सगळ्या परिणीता मैत्रिणींनी स्वत: पुढाकार घेत विविध झाडांची रोपे आणली होती. यात पिंपळ, वड, बदाम अशा विविध झाडांची रोपे लागवड करण्यात आली.  

  याच कार्यक्रमात स्मार्ट चॉईस या सॅनिटरी पॅड्सचे उपस्थित परिणीता मैत्रिणींना वाटप केले. त्याच सोबत सॅनिटरी पॅड्सचे महत्व, कोणते सॅनिटरी पॅड्स वापरावेत, चुकीचे पॅड्स वापरल्याने त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन सुद्धा केले. त्यांच्या सोबत स्मार्ट चॉईस या संस्थेच्या उपाध्यक्षा गीता दिक्षित देखिल उपस्थित होत्या. परिणीता मैत्रिण सुरुची वीरकर यांनी 

या कार्यक्रमाला नवी मुंबईतील पत्रकार संतोष वाव्हळ, संतोष आमले यांच्यासह परिणीता मैत्रिणी राजश्री मधु पाटील, राजश्री कदम, प्राची देशपांडे, शर्वरी राजुरीकर, कुंदा मेंगडे, स्नेहा स्वामी, प्रिया पटनायक, शिल्पा कटरनवरे, सविता कुलकर्णी, वृषाली सुर्वे, अश्विनी बोलके, गोदावरी कात्रे, सारिका क्षीरसागर, कविता गोडे, जयश्री गवळी, सुजाता होलकर यांच्यासह विविध सोशल मिडिया पत्रकार मित्र मैत्रिणी उपस्थित होत्या. 

अशा पद्धतीचे समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही सातत्याने राबवित असतो, या सर्व कार्यक्रमांना परिणीता मैत्रिणी नेहमीच भरभरुन प्रतिसाद देतात यासाठी मी सर्व उपस्थित परिणीता मैत्रिणींची खूप आभारी आहे असे उद्गार परिणीता सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर यांनी काढले. अतिशय उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.


Powered by Blogger.