Breaking News
recent

गोविंद विष्णू महाजन विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

 


मलकापूर प्रतिनिधी


     येथील मलकापूर शिक्षण समिती द्वारा संचलीत गोविंद विष्णू महाजन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालांत प्रमाणपत्र परिक्षेत १० बोर्ड परिक्षेत घवगवीत यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. यंदाचा वर्षी विद्यालयाच्या निकालाची सरासरी ९९.१७ टक्के असुन यात सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थां मध्ये श्रीकांत राजाराम सुरळकर ९४.६० टक्के, कु.अर्पिता निलेश टप  ९२.८० टक्के,  कु. दिपांशा दिलीप धोरण व कु. पुजा प्रमोद बाठे यांना ९०.४० टक्के तर कु.तेजल मनोज जैन ९० टक्के गुण प्रात झालेत.

    शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये विद्यालयातून उच्च माध्यमिक शालांत परिक्षा दिलेल्या १२१ विद्यार्थां पैकी प्राविण्य श्रेणी प्राप्त ४८, प्रथम श्रेणीत ५९, द्वितीय श्रेणीत ११ तर तृतीय श्रेणी सह १ असे एकुण १२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

     विद्यार्थांच्या यशाबद्दल संचालक मंडळ, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Powered by Blogger.