तुळजापूर ते सप्तशृंगीगड बस सेवा आज पासून सुरू
![]() |
पाथरूडकर व सप्तशृंगी गडकर यांचा कडून बस चालक व वाहकाचे सत्कार
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर येणाऱ्या आई तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरीतून येणारी बस सेवा भाविक भक्तांना सुलभ दर्शन मिळावे याकरीता बस सुरू करण्यात आली.तसेच आज दि २८ जून रोजी सकाळी ८ वाजता बस श्री सप्तशृंगी गडावर येताच सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी बस चालक,व वाहक यांचे शाल व श्रीफळ तसेच आई सप्तशृंगी देवीची प्रतिमा देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले. सप्तशृंगी गडावर आई तुळजापूरच्या पुण्यपावन नगरीतून थेट सप्तशृंगी गड येथील आई सप्तशृंगी मातेच्या पुण्यगरीत सप्तशृंगीगड ग्रामपंचायतीच्या व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांच्या निवेदनद्वारे बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
सदर भाविक भक्तांना तुळजापूर जाण्यासाठी किंवा तुळजापूर येथून सप्तशृंगी गडावर येण्यासाठी तुळजापूर ग्रामस्थांच्या माध्यमातून ही बस सेवा सुरू करून भाविक भक्तांना व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.सप्तशृंगी गडावर दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तुळजापूर येथून सायंकाळी ८ वाजता बस मार्गस्थ होईल त्यांनतर सकाळी ८ वाजता श्री सप्तशृंगी गडावर पोहचेल , तसेच तीच बस दिवसभर सप्तशृंगी गडावर थांबा घेऊन रात्री ८.१५ वाजता सप्तशृंगीगड ते तुळजापूर रवाना होईल याकरिता भाविक भक्तांना बसच्या माध्यमातुन सुविधा उपलब्ध झाली आहे..
येण्याचे वेळापत्रक तुळजापूर ते श्री सप्तशृंगीगड
तुळजापूर येथून सकाळी ८ वाजता बस मार्गस्थ होईल
उस्मानाबाद ८.२५ मिं., भूम १० .वाजता, पाथरूड १०.२० मिं, जामखेड ११.३० मिं ,आष्टी १२.वाजता,अहमदनगर १ .४५ मिं,शिर्डी ३.३० मिं,सिन्नर .५.३० मिं,नाशिक ६.१५ मिंसकाळी ८ वाजता श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर पोहचेल .सकाळी ८ वाजता सप्तशृंगी गडावर पोहचल्यावर दिवसभर सप्तशृंगी गडावर बस थांबा घेईल व रात्री ८.१५ मिं. तुळजापूर येथे रवाना होईल.
जाण्याचे वेळापत्रक श्री सप्तशृंगीगड येथून रात्री ८.१५ वा बस निघेल
नाशिक १० वाजता ,सिन्नर १०.४५ मिं, शिर्डी १२.४५ मिं,अहमदनगर २.३० मिं,आष्टी ४.१५ मिं,जामखेड ४.४५ मिं,पाथरुळ ५.३० मिं,भूम ६.१५ मिं,उस्मानाबाद ७.५० मिं, तुळजापूर सकाळी ८.१५ मिं पोहचेल
गेल्या कित्येक दिवसापासून सप्तशृंगी मातेची आरती केल्यानंतर नाशिक या ठिकाणी जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध नसल्यामुळे आमच्याकडं अव्वाच्या सव्वा भाडे स्वीकारून आम्हाला नाशिक जावे लागत होते त्यामुळे आता या बसमुळे आम्हाला आई भगवती ची आरती झाल्यानंतर सुद्धा नाशिकला जाणे सोयीचे झाले आहे. भाविक राहुल वैराळ -नाशिक
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणावरून आम्हाला आमच्या गावाकडे जाण्यासाठी किंवा गडावरती पेढे विक्री करण्याकरता वाहनांची खूप गैरसोय होते त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत सप्तशृंगी गड व स.नि.दे ट्रस्ट यांच्याकडून अर्ज घेऊन स्वतः तुळजापूर या ठिकाणी उपस्थित राहून सदर बस डेपो मॅनेजर यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून बस चालू केली .
या बसमुळे रात्रीचा प्रवास सुद्धा व्यवस्थित होणार यामुळे आम्ही सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ व पाथर्डी येथील ग्रामस्थ तुळजापूर बस डेपोचे मनापासून आभारी आहे. सदाशिव गव्हाणे ...स्टाँल धारक