Breaking News
recent

मलकापूर बस स्थानकात आढळला अनोळखी इसम मृत अवस्थेत ओळख पटवण्याचे पोलीस प्रशासनाचेआवाहन.

 


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर शहर येथील बसस्थानक येथे एक अनोळखी इसम वय अंदाजे ६५ ते ७० वर्षे असा मृत्तअवस्थेत मिळून आला असून बस स्थानक मलकापुर येथील वाहन नियंत्रक म्हणुन कर्तव्यावर असलेले नितीन रमेश मोरे वय ३९ वर्षे यांनी रिपोर्ट दिला. वरून पोस्टेला मर्ग क्रमांक २५/२२ कलम १७४ सिआरपिसी प्रमाणे दाखल आहे. तरी सदर पुरुष जातीच्या अनोळखी मृतकाची अदयापपावेतो ओळख पटलेली नसुन मृतकाची ओळख पटविण्याकरीता प्रयत्न सुरू आहेत. त्याकरीता सदर मृतक याचे प्रेत उपजिल्हा रुग्नालय मलकापुर येथे डी फ्रीजर मध्ये राखून ठेवले आहे . सदर अनोळखी मृतकाचे वर्णन- वय - अंदाजे ६५ ते ७० वर्षे, लिंग पुरुष, उंची ५ फुट ५ इंच, बांधा - सळपातड, रे रंग निमगोरा पोषाख - अंगात काळसर रंगाचे हाफ बाहयांचे सफारी प्रकारचे शर्ट नेसणीस मळकट रंगाची फुल पँटची हाफ पॅट केलेली पॅट, कमरेला लाल व काळ्या रंगाचा धागा बांधलेला, केस - डोक्याचे केस पांढरे झालेले व दाढीचे केस वाढलेले दिसत आहे.

Powered by Blogger.