दिपक नगर येथील 19 वर्षीय युवक बेपत्ता
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर शहरातील दिपक नगर येथील 19 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर शहरातील दिपक नगर येथील प्रसाद काशीनाथ पाटील हा कोन्हाला काही न सांगता निघून गेले त्यांचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आले नाही नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती 16 जुलै रोजी देण्यात आली आहे.