ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी 25,000 /रूपये आर्थिक मदत द्या शेतकरी संघटनेची मागणी
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
बुलढाणा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने मा.तहसीलदार मलकापूर यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले की मागील एक महिन्यापासून संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यात एकसारखा पाऊस पडत आहे त्यामुळे शेतातील पिक खराब होत आहे. शेतीत कोणत्याही प्रकारची काम होत नसल्याने शेती पडीत पडत आहे. फवारणी, डवरणी, निंदण सर्व कामे बंद असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काही शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली अजुनही काही शेतीत वापसा नसल्याने दुबार पेरणी करता आली नाही.
शेत तसेच रिकामे आहे. तरी प्रशासनाने दखल घेऊन संपूर्ण बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी 25,000 /रूपये आर्थिक मदत जाहीर करून शेतकर्यांना धिर द्यावा. अन्यथा नाईलाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.
निवेदन देताना दामोदर शर्मा जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना बुलढाणा, रणजितभाऊ डोसे युवा आघाडी जिल्हाप्रमुख शेतकरी संघटना, रितेशमहाराज पाटील युवा आघाडी तालुका प्रमुख मलकापूर, बाबुराव पाटील, राजेंद्र ठाकुर, ज्ञानदेव सातव, पुंजाजी देवीकार, आत्माराम तायडे, अशोक डांगे कुंजीलालजी धुत, गजानन तायडे हे सर्व शेतकरी हजर होते.