Breaking News
recent

तंत्रज्ञ चालवितात डॉक्टरांना50%कमिशन देऊन स्वतः पॅथॉलॉजी लॅब

 


मलकापूर प्रतिनिधी

गोर-गरीब जनतेला लुटण्याचा धंदा मलकापूर शहरातील काही पॅथॉलॉजी चालविनारे करतात एमडीच्या टेस्ट

   रोगनिदानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅथॉलॉजी लॅब, तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्ट, स्वाक्षरी करणाऱ्या तज्ज्ञांसह अन्य पूरक माहितीबाबत सर्वेक्षण करण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आरोग्य विभागाकडे शहरातील अधिकृत आणि अनधिकृत लॅबची माहितीच नसून, बोगस पॅथॉलॉजी लॅबची संख्या वाढत आहे. याचा फटका नागरिकांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    राज्यात अधिकृत, अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब किती आहेत, याची नेमकी माहिती उपलब्ध नसल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व   जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारातील पॅथॉलॉजी लॅबचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाने पॅथॉलॉजी लॅबचे नाव, पत्ता, त्याची मालकी कोणाची, पॅथॉलॉजिस्ट एमडी डॉक्टराचे नाव, स्वाक्षरी करणाऱ्या डॉक्टराचे नाव, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांच्या कामाच्या वेळा, तसेच संबंधित पॅथलॉजिस्ट आणि मालक यांच्यात करारनामा झाला आहे किंवा कसे, अशी सर्व प्रकारची माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र,  त्याबाबत आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले नसल्याने ही माहितीच त्यांच्याकडे नाही. ' 

    मात्र, प्रत्यक्षात मलकापूर तालुक्यात 80 ते 90 लॅब असण्याची शक्यता आहे. मलकापूर शहरात फक्त 3 लॅब अधिकृत असल्याची माहिती आहे पण पूर्ण बुलडाणा जिल्ह्यात  तरी  ६०० ते ७०० लॅब असू शकतात. यांची संपुर्ण माहिती ही नगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून  माहिती संकलित केली जावी किंवा त्यांच्याकडील सुविधांची माहिती घेतली जावी . त्याप्रमाणे पॅथॉलॉजी लॅबच्या परवानगीवेळी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्याचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. शहराप्रमाणे , तसेच जिल्ह्यातील पॅथॉलॉजी लॅबची माहिती नगरपालिका, जिल्हा परिषद, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडे असणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. दरम्यान, या संदर्भात नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी योगेश घुगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


पॅथॉलॉजी लॅबोरेटरी bio e west  कुठेही फेकले जाते व ते कितपत योग्य आहे ? याचे काही वाईट  परिणाम होणार नाहीत का?असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.


सात हजार बोगस लॅब?

  रुग्णालयाच्या मान्यतेवेळी विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. तशीच मागणी पॅथॉलॉजी लॅबच्या मान्यतेपूर्वी करणे अपेक्षित आहे. मात्र, रेकॉर्डच ठेवले जात नसल्याने शहरात नेमके अधिकृत किंवा अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब किती आहेत याची माहितीच उपलब्ध होत नाही. पॅथॉलॉजिस्टच्या नावाखाली प्रत्यक्षात तंत्रज्ञच अनेक ठिकाणी लॅब चालवित असल्याने बोगस लॅबचा सुळसुळाट वाढला आहे. राज्यात १० हजार पॅथॉलॉजी लॅब असून, त्यापैकी तीन ते साडेतीन हजार पॅथॉलॉजिस्ट प्रत्यक्ष कार्यरत आहेत. सुमारे सात हजार बोगस लॅब महाराष्ट्रात असू शकतात, अशी ओरड सुज्ञ नागरिक करीत आहे.

   सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने २९ ऑगस्ट २०१८ रोजी काढलेल्या पत्रकान्वये सर्व पॅथॅलॅजी लॅबचे सर्वेक्षण करून बोगस लॅबवर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु, केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे बोगस लॅबचा सुळसुळाट झाला आहे. अनेक तंत्रज्ञांनीच स्वतः च्या मालकीच्या लॅब टाकून डॉक्टरांना 50% टक्के कमिशन देऊन लॅब चालविली जात असल्याने डेंगु, मलेरिया, चिकुनगुनिया यांच्या चाचण्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे

Powered by Blogger.