Breaking News
recent

मलकापूर शहरातील शिवसेना शहर प्रमुख, तालुका प्रमुख ,नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे


  बुलडाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा खासदार प्रतापराव ज यांची पक्षातून हकालपट्टी केल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर उमटल्याने शहर प्रमुख किशोर नवले, नगरसेविका सौ. राधिकाताई किशोर नवले, नगरसेविका सौ. ज्योतीताई राजेश फुलोरकर, कृउबास संचालक महेश नवले, तालुका प्रमुख विजय साठे, युवासेना तालुका प्रमुख विजय काळे, शहर उपप्रमुख उमेश हिरुळकर, वैभव कुदळे, स्वप्नील भगत, मंगेश जरे, गौरव आकोटकर, राजू फुलोरकर, उदय राजपूत, गजानन मधुकर धाडे, ओंकारसिंग डाबेराव, अनंता गायगोळ, रामेश्वर मेहसरे, अक्षय रायपुरे, भरत झाल्टे, शंकर वाघ, विनायक माळी, रविंद्र तायडे, श्रीराम वाघ, भरत वाघ, शुभम वाघ दत्तु वाघ, गजानन वाघ, राजु अमबुसकर आदींचा समावेश आहे. 

  मलकापूर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, आम्ही गेल्या १५ ते २० वर्षापासून पक्षात एकनिष्ठ म्हणून काम करीत आहोत. शिवसेनेने आम्हाला शिवसेना शहर प्रमुख, नगरसेवक, कृउबास संचालक यासह अन्य पदे दिलेली आहेत. मात्र नुकतेच जिल्ह्याचे खासदार व संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव यांची पक्षाने हकालपट्टी केल्याबद्दल शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर उमटला आहे. खा. प्रतापराव जाधव यांच्यासारख्या भूमिपुत्र असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी आम्हाला कित्येक वर्षापासून त्यांचेशी जोडन ठेवलेले आहे. अशा लोकनेत्यांची हकालपटी केल्याने आम्ही सर्व मलकापूर शहर शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


Powered by Blogger.