गोरेगाव फाट्यावरील बुवाबाजी च्या नावाखाली सुरू असलेल्या अघोरी कृत्याचा पर्दाफाश- दामुअण्णा महाराज शिंगणे यांच्या इशाऱ्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली दखल
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्या मध्ये काही स्वतः ला ख्रिश्चन म्हणुन घेणाऱ्या लोकांकडून प्रार्थनेच्या नावाखाली बुवाबाजी च्या नावाखाली हिंदू व इतर धर्मियांचे धर्मांतरण सुरू आहे. यामध्ये अगोदर आलेल्या पेशंटला सांगण्यात येते की तुमच्या गळ्यातील तुळशीची माळ काढून टाका. कुठलाच गंडा दोरी बांधू नका. तुमच्या देवघरामध्ये प्रभु येशु ख्रिस्त सोडुन कुठल्याच देवाचे. संताचे किंवा कुठल्याच महापुरुषांचे फोटो लावायला चालणार नाही. आणि असे जर आपण केले तर नक्कीच प्रभु आपणाला असाध्य अश्या रोगांपासून मुक्त करतील. असा दावा याठिकाणी केला जात होता. आणि बरेच लोकं गरजे् पायी त्यांच्या भूलथापांना बळी सुद्धा पडू लागले. गोरेगाव फाटा येथे दर रविवारी भरणाऱ्या या बुवाबाजी च्या खेळा मध्ये हजारो इतर धर्मीय सामील होऊ लागले. म्हणजे ज्यांना दमा. शुगर. गुडघे दुखी. देव अंगात येणे. स्त्रियांचे झुलने. जोरजोरात किंचाळणें. असले रोगी एकत्रित आल्या नंतर त्यांच्या डोक्यावर हात फिरवुन. कुठलेतरी विशिष्ट प्रकारचे तेल लावून. रोग्याला दुरुस्त करण्याची पद्धत त्यांच्याकडे होती.
आणि त्याच बरोबर देणगी च्या नावाखाली हजारो रुपये प्रति रविवारी गोळा केल्या जायचे. दर रविवारी बरेच मुल आणि मुली सुद्धा रोजंदारीवर काम पाहण्यासाठी ठेवले जायचे. आणि हे सर्व करण्यामागचा मुख्य हेतु म्हणजे धर्मांतरण बऱ्याच जणांनी निवेदन दिले तक्रारी सुध्दा केल्या परंतु शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही केली जात नव्हती. परंतू ज्या वेळी बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे. गोरेगाव फाटा येथील बुवाबाजी चा खेळ बंद करा अन्यथा वारकरी समाज रस्त्यावर उतरेल आणि मग त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील त्यास शासन जबाबदार राहील. असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर लगेच काल दिनांक २८ जुलै ला साखरखेरडा पोलीस स्टेशन ला पोलिस अधीक्षक दत्त साहेब आणि उपविभागीय अधिकारी विलास यामावर तसेच ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी समन्वय बैठक घेतली आणि या बैठकी मध्ये महिलांच्या अंगात देव कसा येऊ शकतो.
हे सिद्ध करून दाखवा आणि. फक्त तेल आणि डोक्यावरून हात फिरवला म्हणजे पेशंट बरा होतो. या भूलथापा वर असलेल्या पेशंटला जर योग्य वेळेत योग्य उपचार झाला नाही तर तो दगावण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. असे प्रश्न उपस्थित केल्या नंतर योग्य त्या कार्यवाहीचे संकेत दुपारी दिले होते. त्यानुसार दिलीप कव्हळे. निलेश कव्हळे. विकास गोफने. यासह दहा जनावर जादुटोणा आमचे प्रतिनिधी यांनी कायदा कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.
यापुढे जर या लोकांनी बुवाबाजी च्या नावाखाली चाललेला धर्मांतराचा खेळ थांबविला नाही तर लोकशाहीच्या मार्गाने बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुध्दा दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी दिला आहे.