Breaking News
recent

गुटखा घेवून येणारी टाटा सुमो पकडली महिलेसह दोघे अटकेत -एएसपी पथकाची कारवाई

 

  मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

  खामगाव नांदुरा मार्गे मोठ्या प्रमाणावर गुटखा घेवून येणारी टाटा सुमो एएसपी पथकाने पारखेड फाट्यानजीक पकडली. यावेळी सदर गाडीतून २ लाखाचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करून एक महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे.

    एक टाटा सुमो मोठ्या प्रमाणावर गुटखा घेवून नांदुरा मार्गे खामगाव शहराकडे येत आहे. अशी गुप्त माहिती एएसपी श्रवण दत्त यांना मिळाली होती. यावरून एएसपी पथकाने काल मध्यरात्रीदरम्यान पारखेड फाट्यावर नाकाबंदी करून टाटा सुमोर क्र. एमएच- -०४-ईएस-६८८४ ही पकडली. यावेळी सदर गाडीची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधीत गुटखामिळून आला.

   यावेळी पोलिसांनी गुटख्यासह गाडी जप्त करून प्रतिबंधीत गुटखा घेवून येणारा भारत भास्कर पुंड (२५) रा. घाटनांद्रा ता. मेहकर ह.मु. जगदंबा कॉलनी घाटपुरी ता. खामगाव, सौ. मंगला अंबादास डगडाळे (३४) रा. जगदंबा कॉलनी घाटपुरी ता. खामगाव या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी या दोघांवरही कलम ३२४, २७३, २७२, १८८ भादंवी सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ कलम (२) (टी) २६ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Powered by Blogger.