अग्रवाल समाजाकडून नेसवली पूर्णा नदीला साडी
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
सुहासिनींना अखंड सौभाग्य लाभावे , या हेतूने पूर्णा नदीला साडी नेसवण्यासोबतच संपूर्ण नारी श्रृंगार केला जातो . या दरम्यान महादेवाला दुग्ध अभिषेक करीत छप्पन भोगसह वेगवेगळ्या पदार्थांचा महाप्रसादही चढवीला जातो , हा धार्मिक सोहळा श्री क्षेत्र धुपेश्वरच्या मंदिरात अग्रवाल समाज महिलांच्या वतीने शनिवारी पार पडला . अग्रवाल समाजात महिला भगिनींच्या वतीने श्रावण महिन्याच्या प्रारंभी नदीला साडी नेसवण्याचा तसंच संपूर्ण नारी श्रृंगार करण्याची परंपरा आहे . अग्रवाल समाजातील महिला एकत्रित येऊन हा सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पाडतात . २००५ मध्ये मलकापुरातील श्रीमती बनारसीबाई भिकूलाल अग्रवाल यांच्या परिवाराच्या
पुढाकारातून पूर्णा माईला साडी नेसवण्याचा कार्यक्रम सुरू झाला . तर आता अग्रवाल महिला संमेलन अकोट द्वारा संचालित अग्र नारी महिला असोसिएशन , अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशन बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा अग्रवाल महिला संमेलन शाखा मलकापूरच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शनिवारी पारपडला . यावेळी ५१ साड्या एकमेकांना जोडत त्याची एक मोठी साडी तयार करून धुपेश्वरच्या पुलाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत जोडत पूर्णा माईला नेसवण्यात आली . तसेच नारी श्रृंगारही करण्यात आला .
शहरासह तालुक्यातील महिला सहभागी या सोहळ्यात किरण चिरानीया , कुसुम अग्रवाल , सरलादेवी अग्रवाल , माधुरी महिला भगिनी सहभागी झाल्या . यशस्वीतेसाठी मलकापूरचे सुनील अग्रवाल तर अग्रवाल , मीना अग्रवाल , पुष्पा अग्रवाल , कुंदा अग्रवाल यासह समाजातील तीनशे कुहा काकोडा येथील समाजबांधवांचे सहकार्य लाभले .