तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची धडाकेबाज कारवाई, दोन ट्रक्टर जप्त
तालुक्यात सुरु असलेली गौण खनिजांची अवैधरित्या वाहतुक याला आळा घालण्यासाठी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यानी शुक्रवारी सकाळी १० वाजता च्या सुमारास धडाकेबाज कारवाई केली आहे.तहसीलदार वरणगावकर यांना माहिती मिळताच त्यांनी रेती वाहतुक करणारे ट्रक्टर एमएच २८ बी ३२६२ व ट्रक्टर एमएच २८ एजे ६६७४ क्रमांकाचे दोन्ही वाहने पकडण्यात आली असुन त्या मध्ये रोळी (जाळ रेती) आढळुन आली. चालकास वाहतुक परवाना विचारपुस केली असता परवाना नसल्याचे व अवैध वाहतुक होत असल्याचे निष्पन्न झाले.
हि दोन्ही वाहन संग्रामपुर शहरातिल असुन त्या वाहनांचा पंचनामा करुन ते तामगाव पोस्टेला लावण्यात आले आहे. कारवाई दरम्यान नगर पंचायत संग्रामपुर मुख्याधिकारी यांनी दोन्ही ट्रक्टर नगर पंचायतच्या कामासाठी गौण खनिज वाहतुक करत असल्याची माहिती दिली आहे.या बाबत मुख्याधिकार्यांनी लेखी पत्र दिले असुन या गौण खनिजाचे स्वामित्व मूल्य ३० हजार धनादेशाद्वारे त्यांनी जमा केली. मात्र त्यापुर्वीच कारवाईचा अहवाल जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.