मोताळा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी!
मोताळा प्रतिनिधी
प्रत्येक व्यक्ती जन्मापासून मरेपर्यंत आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी चांगलं, वाईट शिकत असतो. त्यामुळे त्या व्यक्तीवर संस्कार घडत असतात. ज्यांच्या ज्यांच्याकडून आपण शिकत असतो ते सर्व आपले गुरु आहेत. गुरुपौर्णिमा हा त्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो.
आई हा आपला पहिला गुरु आहे तर वडील हा आपला दुसरा गुरु त्यानंतर शिक्षक तसेच मरेपर्यंत आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती निसर्गातील झाडे, पक्षी, प्राणी, नदी, डोंगर इत्यादी सर्वांकडून आपण काहीतरी शिकतच असतो झाडे, पक्षी, प्राणी यांच्याकडून परोपकार शिकत असतो. मुंगी ही अत्यंत लहान असली तरी तिच्यापासून शिस्त शिकण्यासारखी असते. कुत्र्यापासून प्रामाणिकपणा शिकण्यासारखा आहे दोन वर्षांपूर्वी आलेला कोरोना हा सुद्धा आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व सांगून गेला, तसेच लग्नात होणारा भरमसाठ खर्च कमी करून ५० व्यक्तींमध्ये लग्न सोहळा पार पाडण्यास भाग पडून खर्चाचा बोजा कमी केला सगळीकडे ऑनलाईन झाल्यामुळे वेळेची बचत शारीरिक, मानसिक त्रास कमी झाला हे सर्व कोरोनामुळे आपण शिकलो. मोताळा येथे गुरुप्रसाद लॉन्स येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत थाटात दि. १३ जुन रोजी नुकताच पार पडला.
यामध्ये उपासना यज्ञ हरीपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर सद्गुरु श्री.वामनराव पै यांच्या प्रतिमेचे सर्व नामधारक व नामधारीका यांनी पूजन केले. सद्गुरुच्या ज्ञानाचा आपल्या जीवनात कसा फायदा झाला याबद्दल मलकापूरचे शाखाध्यक्ष श्री.टेकाळे काका, चौधरी काका, वावगे मामा यांनी सद्गुरूंच्या ज्ञानाबद्दल सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त केली सद्गुरुचे ज्ञान जीवनात कसे उपयोगात आले व त्यामुळे आपल्या जीवनात कसा बदल झाला याबाबत नामधारक श्री.संदीप तायडे, अमोल किरोचे अनिल नाफडे यांनी नामधारकांशी सुख संवाद साधला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव दाते यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन बोदडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप वक्टे, प्रवीण चौधरी, गजू चित्रंग, एकनाथ गोडसे, मनोहर भटकर, वैभव भटकर, मनोहर गोंड आणि मोताळा व मलकापूर येथील सर्व नामधारक यांनी प्रयत्न केले.