Breaking News
recent

बुलढाणा जिल्ह्यात १२ आणि १३ जुलै रोजी अतिवृष्टीचा नागपूर हवामान केंद्रांचा अंदाज

 


मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर 

  जिल्ह्यात १२ व १३ जुलै रोजी अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याच्या नागपूर केंद्राने दिला आहे . हवामान खात्याने पुढील ४ दिवस जिल्ह्यात  अतिवृष्टीचा इशारा दिला आहे . सागरातील हालचाली लक्षात घेता मान्सून सक्रिय राहील असा अंदाज आहे . बुलडाणा जिल्ह्यात १२ व १३ जुलै ला काही ठिकाणी अतिवृष्टी चा अंदाज वर्तविण्यात आला आहे . यादृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आजवर समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे . बुलडाणा १७८ मिमी , चिखली १०२ , देऊळगाव राजा १०५ , सिंदखेड राजा १४० , शेगाव १०३ या तालुक्यात पावसाने शतक ओलांडले आहे . मेहकर ८७ मिमी , लोणार ९८ , खामगाव ७७ , मलकापूर ४४ , मोताळा ६८ , नांदुरा ७८ मिमी अशी अन्य तालुक्यांची आकडेवारी आहे . जळगाव, संग्रामपूर मध्ये मात्र कमी म्हणजे ३८ , व ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Powered by Blogger.