४० बिघा परिसरात असलेल्या अतिक्रमीत धारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्या बरोबरच या परिसरातील समस्या तातडीने सोडविण्याकरीता प्रहार जनशक्ती पक्ष व भारतीय जनता पार्टी च्या वतीने निवेदन
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
४० बिघा परिसरात असलेल्या अतिक्रमीत धारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्या बरोबरच या परिसरातील समस्या तातडीने सोडविण्याकरीता आज २६ जुलै रोजी भारतीय जनता पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोर्चा काढून न.प.मुख्याधिकारी मलकापूर यांना निवेदन देण्यात आले.
मलकापूर न.प. हद्दीमध्ये येत असलेला ४० बिघा परिसरामध्ये अनेक नागरिक अतिक्रमीत जागेमध्ये राहतात. त्या नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. मात्र त्यांना घरकुल योजनेचा कुठलाही लाभ अद्यापही मिळालेला नाही. तेव्हा त्या गरीब अतिक्रमीत धारकांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देवून त्यांना योजनेत सामावून घेण्यात यावे. त्याच प्रमाणे ४० बिघा परिसरामध्ये नागरी मुलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने दिसून येत आहे. रस्त्यांवर बNयाच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना अवागमन करतांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच पावसामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव सुध्दा वाढला असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी सुध्दा न.प. प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्याने ४० बिघा परिसरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज न.प. वर मोर्चा काढून न.प. प्रशासनाचा निषेध करीत या परिसरातील समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, भाजपा युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येसी, शहर उपाध्यक्ष अमोल टप, मोहन पाचपांडे, आशिष माहुरकर, प्रहार तालुका प्रमुख अजित पुंâदे, तालुका महिला प्रमुख शुभांगी डवले, सौ.सिमा टप, सौ.वनिता टप, दिपक चंदनकर, जितू ठोसर, सौ.वैशाली साखळीकर, चंद्रभागाबाई ढगे, शोभा चव्हाण, संतोष जाधव, बळराम बावस्कर, वसंता घोडके, अनेस साखळीकर, रवि वानखेडे, रूपेश श्रीमाळ, गणेश रोठे, भिमा इंगळे, विशाल उंबरकार, पिंटू मुंधोकार, देवेन टाक, कुणाल ढोलकर, सुरज उंबरकार, आशाबाई खराटे, श्रीधर वानखेडे, दिनकर मुंधोकार, संतोष उंबरकार, सचिन बुडुकले, अशोक गाढवे, राहुल तायडे, उमेश जाधव यासह ४० बिघा परिसरातील महिला, पुरूष प्रामुख्याने उपस्थित होते.