श्री गाडगे महाराज वृद्धाश्रम दहिगाव येथे आधारपर्व फाउंडेशन तर्फे सांत्वन करून भेट स्वरुपात पिलोचे वाटप
नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा निस्वार्थ समाजसेवेच्या माध्यमातून गरीब गरजु,अपंग,निराधार यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रभर अविरत सेवाकार्य सुरू असलेल्या आधारपर्व फाउंडेशनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील दहिगाव तालुका नांदुरा येथील श्री संत गाडगेबाबा मिशन मुंबई यांच्याद्वारे चालविण्यात येत असलेल्या गाडगेबाबा वृद्धाश्रमास सांत्वनपर भेट देऊन तेथील वृद्ध व्यक्तींची तब्येतीची विचारपूस करीत तेथे आवश्यक लागत असणारे पिलो भेट स्वरूपात देऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात आला यावेळी आर के भैया,सुनिल ढोले पाटील सर,सौ.पाटील ताई, सूनिताताई ताथोड,श्रद्धाताई गढे उपस्थिती होते.
प्रत्येक महीन्याला गरजूंना फूल ना फुलाची पाकळी मदत करणारे सेवाकार्यात सहभागी सदस्य आर के भैया,निताताई वायकोळे,पवन चव्हाण,वाल्मीक खराटे,सुनिताताई ताथोड,वैशालीताई जाधव,संतोष फाळके,अर्जुनसिंग राजपूत,चेतन नराजे,आकाश कवडे,सचिन चौबे,अंनता वाघ,किशोर लोखंडे,वैष्णवी शिंदे,अर्जुन पाटील,रघुनाथ नेवरे,सुनील ढोले यांचे अनमोल सहकार्य लाभले.बर्थ डे असो की काही कार्यात आपण वायफाय खर्च करतो या पुढे समाजसेवेचा उपक्रम हाती घेऊन गरीब गरजु अपंग निराधार यांना मदतिचा हात देऊन वाढदिवस साजरा करा असे फाउंडेशन अध्यक्षा श्रद्धा गढे यांनी कळविले.