Breaking News
recent

संग्रामपूर पं. स.च्या ८ गणाची आरक्षण सोडत १३ जुलै रोजी

संग्रामपूर प्रतिनिधी

   संग्रामपूर  तालुक्यात असलेल्या पंचायत समिती ८ गणाच्या आरक्षणाची सोडत १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता येथील तहसिल कार्यालयातील सभागृहात ड्रॉ पध्दतीने काढण्यात येणार आहे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर यांचे उपस्थीतीत आरक्षण सोडत काढण्यात येइल तालुक्यात सोनाळा टुनकी बावनबीर पातुर्डा पळशी कवठळ वरवट बकाल वानखेड असे एकूण ८ पं स . चे गण असून यात अनु. जाती जमाती महिला राखीव या प्रवर्गासाठी आरक्षण या दिवशी निश्चित करण्यात येणार आहे.

   आरक्षणाचे प्रारूप १५ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. या दिवशी काढण्यात येणाऱ्या आरक्षणावर १५ ते २१ जुलै या कालावधीत हरकती व सुचना निवडणुक विभागाकडे स्विकारण्यात येती. जि.प.पं.स निवडणूक अधिनियम १९६१ मधील कलम १२ उपकलम ( १ ) नुसार चक्रानु क्रमानुसार ही सोडत काढण्यात येणार आहे. तरी या आरक्षण सोडतसाठी इच्छुकांनी तहसिल कार्यालयात उपस्थीत राहण्याचे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Powered by Blogger.