२६ गुन्हयातील फरार आरोपीसह ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी यवत पोलिसांनी केली जेरबंद. यवत गुन्हे शाखेची कामगिरी
दौंड- दिनांक ०२/०७/२०२२ रोजी बोरीभडक, ता.दौंड जि. पुणे येथील शेत जमीन गट नं.१४/१ मधील शिवाजी धर्मा गायकवाड यांच्या शेतात असलेली डीपी कोणीतरी अज्ञात चोरट्यााने स्ट्रक्चर वरून नट बोल्ट खोलून खाली पाडून त्यातील ऑइल सांडून नुकसान करून त्यातील अंदाजे एकूण १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा कोणीतरी अज्ञात चोरट्यााने चोरून नेले बाबत यवत पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होता.
दिनांक ०८/०७/३०२२ रोजी यवत पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम व गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की यवत पोलीस स्टेशन हद्दीतील डीपी चोरणारे संशयित राहू शिवाजी चौक येथे येणार असलेची खात्रीशीर माहिती मिळालेने सदर पोलीस पथकाने गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफ सह मौजे राहू छत्रपती शिवाजी महाराज चोक येथे सापळा लावून थांबले असता एक संशयित कार मधील चार इसम राहू येथील लक्ष्मीआई मंदिराजवळ आले असता यवत गुन्हे शोध पथकाने त्यांना मारुती ८०० कारसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर संशयित इसमांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने राहु, कानगाव, पाटस, कासुर्डी, बोरीभडक, खुटबाव, उंडवडी, कोरेगाव भिवर असे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण २८ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे केलेचे सांगितले .
इसम नामे १) दत्ता अशोक शिंदे वय २८ वर्षे, रा.राहु, थोरले विहीर, ता.दौंड जि.पुणे २) राज मच्छिंद्र वानखडे वय १९ वर्षे, रा.केडगाव, म्हसोबाचा मळा, ता.दौंड, जि.पुणे. मुळ रा.बिडगाव, ता.मुर्तुजापुर, जि.अकोला ३) विशाल मनोहर सोनवणे वय ३० वर्षे रा.सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे ४) महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार वय २९ वर्षे, रा.केडगाव, ता.दौंड, जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांनी गुन्हयातील चोरीचा माल इसम नामे आमजद पाशामियाॅ खान वय ४० वर्षे, रा. साईनगर, कोंढवा, ता.हवेली, जि.पुणे यास विकल्याने त्यास सदर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेकडुन कि.रू १७६७५०/- रू च्या ३५०किलो तांब्याच्या तारा जप्त करणेत आलेल्या आहेत. तसेच इतर आरोपींकडुन गुन्हयात वापरलेल्या दोन मारूती ८०० कार, एक पॅशन प्लस मोटार सायकल व चार मोबाईल असा १६०,०००/- रू किमतीसह एकुण ३,३६,७५०/- रू चा मुददेमाल जप्त करणेत आलेला आहे.
सदर आरोपींना अपर व सत्र न्यायालय बारामती यांनी ३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असून वरील आरोपींकडून यवत पोलीस स्टेशन कडील रोहित्र चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.असे एकूण ४ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून आरोपींकडून ३,३६,७५०/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी दत्ता अशोक शिंदे रा.राहु थोरली विहीर, ता.दौंड, जि.पुणे हा रेकाॅर्ड वरील गुन्हेगार असुन तो २६ गुन्हयांमध्ये निष्पन्न झालेला फरार आरोपी होता.
तसेच आरोपी महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार , मच्छिंद्र वानखेडे हे देखील 11गुन्ह्यात फरार आरोपी होते. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, व यवत गुन्हेशाखेची संपुर्ण टीम.