अखेर काळेगाव ला प्रशासनाने दिली भेट, ग्रामस्थांची आरोग्य यंत्रणेकडून सुरूय तपासणी, चार दिवसांपासून गावाला होता पुराचा वेढा
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर तालुक्यातील काळेगाव ला आज अखेर प्रशासनाने भेट दिली असून आरोग्य यंत्रणा सुद्धा ग्रामस्थांची तपासणी करत आहे.. तर या गावाला कायमस्वरूपी एक बोट ही प्रशासनाने उपलब्ध करून दिलीय.. काळेगाव ला मागील चार दिवसांपासून पुराचा वेढा होता, त्यामुळे त्यांचा मलकापूर तालुक्यासाठी संपर्क तुटला होता.. आणि याच गावातील एका चिमुकल्याला त्याची आई ट्युब वर बसून रुग्णालयात घेऊन गेली असल्याचा व्हिडिओ काल व्हायराल झाला होता. बुलडाणा जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू होती.
त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला होता, तर उपनदी असलेली विश्र्वगंगा नदीला ही पूर आल्याने मलकापूर तालुक्यातील काळेगाव ला पुराचा वेढा बसला.. त्यामुळे ग्रामस्थांना मागील चार दिवसांपासून इकडून तिकडे जाता येत नव्हते आणि तालुक्यासाठी संपर्क ही तुटलेला होता.. गावात अनेकांना ताप सर्दी खोकला, वृद्ध मंडळी आजारी पडलेलं होते.. अशातच काल एक लहान चिमुकला पडल्याने त्याला दवाखान्यात नेण्यासाठी त्याच्या आईने ट्यूब वर बसून जीवघेणा प्रवास करीत पुरातून मार्ग काढला आणि रुग्णालय गाठले.. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आणि टीव्ही ला बातमी आल्यावर आज अखेर प्रशासनाने गावात पोहचून ग्रामस्थशी संवाद साधला आणि आरोग्य यांत्रणेने सुद्धा आजारी व्यक्तींची तपासणी केलीय.. शिवाय एक बोट ही उपलब्ध करून दिलीय..
ग्राम काळेगाव येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विश्वगंगा नदीला पूर आला होता त्या पुराचा वेढा संपूर्ण गावाला असल्याने गावकऱ्यांची अतोनात हाल झाले या गंभीर बाबीची दखल प्रशासनाने तत्काळ घेत हव्या त्या उपाययोजना केले आहेत तसेच प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ आमच्या गावाला भेट देऊन एक कायमस्वरूपी बोट सुद्धा उपलब्ध करून दिली आहे- ग्रामस्थ
ग्राम काळेगाव येथील पूर आता ओसरला असून संपूर्ण गावाची पाहणी आम्ही केली आहे यापुढेही पूर परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही प्रशासनाच्या वतीने हव्या त्या उपाययोजना करण्यासाठी तत्पर आहे तसेच आम्ही आज गावात आरोग्य यंत्रणा पाठवून पूर्ण ग्रामस्थांचे आरोग्य तपासणी केली आहे तसेच यापुढे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याकरिता गावचा संपर्क तुटू नये याकरिता आम्ही कायमस्वरूपी एक बोट ग्रामस्थांना उपलब्ध करून दिली आहे .- तहसीलदार राजेश सुरळकर