Breaking News
recent

मलकापूर येथे प्रथमच सफाई कामगार महिलांसाठी स्नान गृह व प्रसाधान गृहाचे लोकार्पण


प्रतिनिधी नागेश सुरंगे

   बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे प्रथमच सफाई कामगार महिलांसाठी पहिले सर्व सुविधायुक्त स्नानगृह नगर पालिका फंडातून नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आले असून त्या स्नानगृहाचे लोकार्पण कार्यक्रम महाराष्ट्र सफाई कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री नागेजजी कंडारे व "समतेचे निळे वादळ" संघटनेचे संस्थापक तथा नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले .

   आजवर जिल्ह्यातील सर्व प्रकारची साफसफाई करणारे कामगार यांच्यासाठी कुठेही स्नान गृह प्रसाधनं गृह बांधण्यात आलेले नव्हते,पूर्णतः दुर्लक्षित असलेला समाज वाल्मिकी समाज असून त्यांच्यासाठी कुठल्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नसतात मात्र मलकापूर येथील नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांनी दुर्लक्षितपणाचा विचार करून त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा असाव्यात या दृष्टीने अन्नाभाऊ साठे दलित वस्ती नागरी सुधार योजनेअंतर्गत   "महर्षी वाल्मिकी समाज सभागृह" बांधण्याचा सफल प्रयत्न करून प्रत्यक्षात उतरवले व त्याचे लोकार्पण सुद्धा माजी आमदार श्री चैनसुख संचेती,मलकापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री अशोक राजदेव,अशांतभाई वानखेडे व नागेजजी कंडारे यांच्या हस्ते नप उप मुख्याधिकारी श्री पगारे,नगर अभियंता श्री आकाश वाघ, भाई प्रकाश पचेरवाल ,अशोकभाऊ दाभाडे,चावरे ,पिवाल आदींच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले.

यावेळी सर्वश्री इमरान शेख,विशाल मदवानी, डी.के. उर्फ राजु टाक, रविचंद टाक, दत्तू पहेलवान टाक, रमेश रानवे, घनश्याम टाक, शांताराम सारसर, प्रल्हाद टाक, पप्पु फुटाने, मुकेश टाक, प्रकाश टाक, अशोक रानवे, प्रल्हाद सिरसवाल, मानसिंग सारसर, गोकुल खरारे, सुनिल पिवात. हुकुमचंद ढंडोरे, संजय टाक, लाखन चिरावंडे, राजेश जाझोट, मनोज बागडी, सुभाष धनजे, गिरधारी जाझोट, दिलीप टाक, देवा सारसर, संतोष टाक (ठेकेदार), नंदु खरारे, संतोष टाक, गणेश वेद, अनिल डागोर,, फकिरा धेडुंदे, ईश्वर टाक, राजेश पथरोड, सुधिर गोयर, राजेंद्र जाझोट, सोनु करोसिया, संतोष चंडाले, गणेश टाक,रणजीत ढोलकर तथा समस्त रामदेव बाबा नगर मित्र मंडळ व समाज बांधव मलकापूर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

   सदर प्रसंगी अशांतभाई वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न कार्यक्रमात मा.चैनसुख संचेती,नागेजजी कंडारे,प्रकाशभाई पचेरवाल,अशोकभाऊ दाभाडे यांची प्रबोधनपर भाषणे झालीत.यानंतर सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Powered by Blogger.