Breaking News
recent

तिघांची आत्महत्या यवत राहू पाटस येथील तिघेजण.

 


विजय कदम प्रतिनिधी दौंड

   यवत (ता.दौंड) यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत यवत राहू आणि पाटस येथील तिघांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवार (दि.२३) रोजी घडली.

    यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यवत येथील सुभाष नानासाहेब दोरगे (वय ४५ वर्ष) याने शनिवार(दि.२३) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास यवत हद्दीत यवत-खुटबाव रेल्वे पुलावर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली.

दुसऱ्या घटनेत राहू(ता.दौंड) येथील संजय सोपान तांबे (वय ३५ वर्ष ) यांनी राहत्या घरी विषारी औषधं रविवार (दि.१०) रोजी प्राशन केले होते त्यानंतर पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते, परंतु उपचाराअंती शनिवार(दि.२३)रोजी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

     तर पाटस येथील धनंजय दत्तात्रय शितोळे(वय ४८वर्ष) याने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने पत्र्याच्या लोखंडी अँगल गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांनी सांगितले.

Powered by Blogger.