Breaking News
recent

आधारपर्व फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग परिवारास एक हात मदतीचा

 


मलकापुर- आधारपर्व फाउंडेशनच्या माध्यमातून गरजु,अपंग,निराधार यांच्या मदत सेवेत संपुर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपक्रम राबविले जात असुन आज आधारपर्व फाउंडेशनच्या वतीने अकोला शहरातील लक्ष्मी नगर येथील दिव्यांग पती पत्नी क्षीरसागर कुटुंबाची भेट घेऊन त्यांचा समस्या जाणुन घेतल्या घरची परिस्थिती अत्यंत नाजुक असून घरात दीव्यांग पती संतोष क्षीरसागर पत्नी अलका  क्षीरसागर दोघेच राहतात कोणाचाच सहारा नसुन कुटुंबातील आर्थिक परिस्थिती पाहतात त्यांची भेट घेऊन या परिवाराला एक महिन्याच्या किराणा किट देऊन मदतीचा हात देण्यात आला या सेवा उपक्रमात अनमोल मदतीचा हात देणारे सेवेकरी आर्जुनसिंग राजपूत, नीताताई वायकोळे,वैशाली जाधव ,संतोष फाळके ,नास्तिक गावंडे, बासू गुप्ता, सुनील ढोले, Rk भैया, किशोर लोखंडे ,सचिन मित्रा, सुनीता ताथोड, अमोल बावस्कार,चेतन नराजे,श्रद्धा गढे यांचे अनमोल सहकार्य लाभले.

अनमोल मदत सेवाकार्याबद्दल सर्वांच्या मदतीमुळे गरजूंना फुल ना फुलाची पाकळी का होईना मदत मिळून त्यांचा चेहऱ्यावर जे हास्य उमटते त्यातच आधरपर्व फाऊंडेशन परिवाराला समाधान मिळत आहे असे फाउंडेशन अध्यक्षा श्रद्धा गढे यांनी कळविले.

Powered by Blogger.