जिल्हास्तरीय सबज्युनिअर व ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धा संपन्न
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
सबज्युनिअर व ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेचे मलकापूर येथे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय सबज्युनिअर व ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत प्रिय चौधरी, जतकर, शरयू पारसकर, ओझस झोलेकर, पार्थ फिरके, संस्कृती गायकवाड यांनी सुवर्णपदक पटकाविले. जिल्हास्तरीय सबज्युनिअर व ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धा मलकापूर येथे संपन्न झाल्या. यावेळी उद्योजक मनिष लखानी, बॅडमिंटन स्पोर्टस् असोचे सचिव विजय पळसकर, , किशोर चांडक, बाबुलाल चौधरी, आदित्य बाहेती राम अग्रवाल प्रा. नितीन भुजबळ, डॉ भावना पाटील, राजेश्वर खंगार, डॉ. माधुरी पाटील आदींची उपस्थिती होती. सदर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बुलडाणा जिल्हातील ९० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता.
यातील प्राविण्यप्राप्त विजेते खेळाडूंचा संघ निवडला गेला असुन हा संघ यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत बुलडाणा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत परशुराम काचवाल चेयरमन रेफरी बोर्ड, अतुल हाडे, अमोल तायडे, दीपक चव्हाण, अविनाश वेलळीकर, संकेत आढाव आदींनी पंचाची भूमिका पार पाडली. स्पर्धेत विजेते झालेल्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी खिझर खान, प्रफुल्ल वानखेडे, अनिल जाधव, राहुल जगदाळे आदींचे योगदान राहिले