Breaking News
recent

मन नदीच्या पुलावरून पाणी: शेगांव-अकोला वाहतूक बंद


प्रतिनिधी नागेश सुरंगे

  गेल्या दोन - चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेगांव तालुक्यातील नागझरी येथील मन नदीला मोठा पूर आला असून, शेगांव नागझरी, कसुरा, निमकर्दा, अकोला वाहतूक बंद पडली आहे. अकोला जिल्ह्यातील अनेक नद्या मन नदीला मिळत असल्याने या नदीला नेहमी मोठे पूर येतात.

   त्यातच गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण विदर्भात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या नदीला मोठा पूर आला असून शेगांव - नागझरी, कसुरा, निमकर्दा, अकोला संपर्क तुटला आहे. सध्या नागझरी येथील पुलावरून ५ फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तर आता बाहेर जायचे असल्यास शेगांव - बाळापूर मार्गे जाण्याचा मार्ग मोकळा आहे. परंतु हा मार्ग खूप फेऱ्या चा असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. दुसरीकडे शेगाव-अकोट मरगावरील लोहारा गावाजवळील मन नदीवरील पुलाला पाणी टेकले आहे.


Powered by Blogger.