Breaking News
recent

वरखेड येथील २१ वर्षीय तरुणी बेपत्ता



प्रतिनिधी नागेश सुरंगे

   वरखेड येथील २१ वर्षीय तरुणी घरून पेपर देण्यासाठी गेली असता परत घरी न परतल्याने तरुणीच्या वडीलांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली आहे. वरखेड येथील बबलु फुलचंद जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलगी नामे कु. प्रियंका बबलु जैस्वाल (वय २१) ही वरखेड येथून ऑटोरिक्षाने मलकापूरला जनता कला वाणिज्य महाविद्यालय येथे बीएस्सी भाग - ३ चा पेपर देण्यासाठी गेली होती.

    मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परत आली नाही. तिच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो बंद आला. त्यानंतर मलकापूर परिसरात व इतरत्र तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती आढळून आली या तक्रारीवरून पोलिसांनी मिसींग क्र. २७/२०२२ अन्वये नोंद केली. सदर तरुणीचा रंग गोरा, उंची ५ फुट ६ इंच, केस लांब व काळे, अंगार ग्रे कलरचा टॉप व निळ्या रंगाची जिन्सपॅन्ट, गळ्यात पिवळ्या रंगाची बेन्टेक्सची चैन असे वर्णन असून सदर तरुणी आढळून आल्यास मलकापूर शहर पो. स्टे. शी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Powered by Blogger.