Breaking News
recent

अपघातात १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

     भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने प्रवाशी अपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात किनगाव येथील १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस प्रकाश तायडे (वय १७) रा. किनगाव हा अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. गेल्या काही दिवसांपासून तो पंढरपूर येथे गेले होता. पंढरपूरहून परल्यानंतर तो जळगाव येथून घरी किनगाव येथे येण्यासाठी अपेरिक्षाने बसला. 
    धामणगाव फाट्याजवळ पेट्रोलपंपासमोरून प्रवाशी रिक्षा जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात डंपरने प्रवाशी अपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तेजस तायडे हा जागीच ठार आला. तर इतर प्रवाशी देखील जखमी झाले. त्यांचे नावे अद्याप समजू शकले नाही. मयतावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Powered by Blogger.