लोकशाही दिनानिमित्त अमृत जवान अभियान कार्यक्रमाचे आयोजन
नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा :- तालुक्यातील माजी सैनिक शहीद जवान व सेवेत कार्यरत असलेले सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय कार्यालयामध्ये लोकशाही दिना निमित्त माजी सैनिक, शहीद जवान, शहीद विधवा पत्नी कुटुंबीय सैनिकांचा प्रलंबित कामाचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी, अमृत जवान अभियान 2022 राबविण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार तालुकास्तरीय अमृत जवान अभियान 2022 राबविण्याबाबत पंचायत समिती सभागृह येथे दिनांक 15 जुलै 2022 रोजी दुपारी 12:00 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व संबंधितांनी व माजी सैनिक, शहीद जवान, शहीद जवान कुटुंबीय व सेवेत कार्यरत सैनिक अर्जदारांनी सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन नांदुरा तहसीलदार श्री.राहुल तायडे यांनी केले आहे,