मलकापूर तालुक्यातील अधिकाऱ्याकडून सुरू असलेल्या हप्ते वसुलीची तात्काळ चौकशी करावी
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर तालुका दारूबंदी अधिकारी मुंगळे व शिपाई सौभागे हे मोठ्या प्रमाणावर दारू दुकानदारांकडून हप्ता वसुली करत असून या मोबदल्यात दारू दुकानदार दारूची चढ्या दराने विक्री करून, दुकाने ही सकाळी ६ वाजेपासून उघडत असून ग्राहकांची सर्रास लुट सुरू आहे.
अधिकारी व शिपायाच्या या हप्तेखोर पणामुळे ग्राहकांना मात्र मोठा आर्थिक भूर्दंड पडत आहे. तरी या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून या दोघांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दलित सेनाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष संदीप भगत यांनी निवेदनाद्वारे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक बुलडाणा यांच्यासह राज्य शुल्कचे आयुक्त मुंबई, मुंबई राज्य शुल्कचे सहआयुक्त नागपूर व विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे स्पीड पोष्टद्वारे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मलकापूर तालुक्यातील दुकानदार ओमप्रकाश जैस्वाल, संजय जैस्वाल, बंडूभाऊ राठोड, विशाल चोपडे, संजय श्रीकांत जैस्वाल, अमोल फासे, रमेश भारंबे, पाटील व जैस्वाल ही शहरातील व तालुक्यातील देशी दारू विक्रेते सर्रासपणे टँगो १८० एमएल देशी दारूची एमआरपी ७० रुपये असतांना ८० रुपयांना विकतात. तर देशी टॅगो ९० एमएलचा दर हा ३५ रुपये असतांना ग्राहकांकडून ४० रुपये घेतात. यासह हे दुकानदार दुकान उघडायचा वेळ शासनाने दिलेल्या नियमानुसार न उघडता सर्रासपणे सकाळी ६ वाजता उघडतात.
या सर्वाच्या मोबदल्यात तालुका दारूबंदी कार्यालयातील शिपाई सौभागे हे या दुकानदारांकडून वसुली करून ते व अधिकारी मुंगळे हे भ्रष्टाचार करत आहेत. तर त्यांच्याच आशिर्वादाने धरणगाव येथील जैस्वाल यांची ५०० मीटरच्या लांब परवानगी असलेले दुकान सर्रास हायवेवर जुन्या जागेवर सुरू असून या मोबदल्यात सौभागे व मुंगळे यांनी मोठा आर्थिक तडजोड केल्याची चर्चा सर्वत्र आहे. अधिकारी व शिपायाच्या या हप्तेखोरपणामुळे तालुक्यातील दारू दुकानदार सर्रासपणे लुट करत असून या सर्व प्रकाराची तात्काळ वरिष्ठांनी चौकशी करावी, अशी आग्रही मागणी दलित सेनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष संदीप भगत यांनी केली आहे.