Breaking News
recent

प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी येथे वृक्षारोपण संपन्न.



मेहकर तालुका प्रतिनिधी,शिवशंकर मगर

   देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरणात भर पडावी तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संतांच्या वाणी प्रमाणे जुलै महिना म्हटला म्हणजे निसर्ग हा नववधूप्रमाणे नवलाईने नटलेला. या नवदुला आणखीनच शृंगार म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

  यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील सुलताने, डॉक्टर विशाल सुरुशे व आदी मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व आरोग्य कर्मचारी वृंद उपस्थित होते. आपण प्रत्येकाने दरवर्षी एक तरी झाड लावून जगवले पाहिजे असा संदेश यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील सुलताने यांनी दिला.

Powered by Blogger.