हिंदुसुर्य महाराणा प्रताप यांच्या नावाने मलकापूर मध्ये एक वास्तू तयार करू शकलो हे मी माझे भाग्य समजतो- आ. राजेश एकडे
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मौजे वाकोडी ग्रामपंचायत अंतर्गत बोदवड फाटा येथे आकर्षक तयार झालेला प्रवाशी निवारा आज पावसाळ्यात विद्यार्थी, व प्रवाशी बांधवांना आसरा देण्याचे काम करत आहे. तेही आश्रय देणारे नाव म्हणजे भारत मातेचे विर सुपुत्र हिंदूसूर्य महाराणा प्रताप. मलकापूर नगरीतील सकल राजपूत बांधव व समस्त मलकापूरवाशीय यांच्या साठी एक गौरवाची बाब निर्माण केली ती म्हणजे मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. राजेश एकडे यांनी. मलकापूर मध्ये जवळपास सर्व थोर पुरुषांच्या नावाने स्थळ,ठिकाण आहेत परंतु महाराणा प्रताप यांच्या नावाने एकही वास्तू मलकापूर मध्ये नव्हती गेल्या कित्येक वर्षांपासून समाजबांधवांनी तशी मागणी सुद्दा होती.
परंतु तत्कालीन प्रतिनिधीनी लक्ष न देता दुर्लक्ष केले.असो प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे सर्वजण आपल्या या भेटीमुळे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील याची मी आपणास ग्वाही देतो असे मलकापूर तालुका काँग्रेसचे युवा नेते श्यामसिंग राजपूत यांनी मा.आमदार श्री. राजेश एकडे यांचे आभार मानून सांगितले की आमदार साहेब समस्त राजपूत समाज तथा मलकापूर वासीय आपले ऋणी राहील, आपल्या कार्याची दखल नक्कीच आमच्या लक्षात राहील. अशी पावसाळी भेट आपण आम्हाला दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद!.
त्यावेळी मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.राजेश एकडे म्हणाले हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या नावाने मी एक छोटीशी पण सर्वांच्या नजरेत भरेल अशी वास्तू तयार करू शकलो हे मी माझे नशीब,भाग्य समजतो.यापुढची आपली असलेली मागणी माझ्या लक्षात आहे.