Breaking News
recent

मलकापूर तालुक्यात २७ जागांसाठी ९९ अर्ज तीन ग्रामपंचायतींची निवडणूक


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे


मलकापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या ४ आॅगस्ट रोजी होऊ घातली आहे. त्यातील २७ जागांसाठी १० प्रभागांतून ८७ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. मलकापूर तालुक्यातील उमाळी, बेलाड व आळंद या ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. या ग्रामपंचायतींत एकूण १० प्रभागांतून २७ जागांसाठी निवडणूक होत आहे. उमाळीत ४३ उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले आहेत. बेलाड येथे ३६ उमेदवारांनी ४१ अर्ज दाखल केले आहेत. आळंद येथे ८ उमेदवारांनी ८ अर्ज दाखल केले आहेत.


तालुक्यातील तीनही ग्रामपंचायतींत १० प्रभागांतील २७ जागांसाठी ८७ उमेदवारांनी ९९ नामांकन अर्ज दाखल केल्याचे मंगळवारी शेवटच्या दिवशी मतदान तर ५ आगस्ट रोजी स्पष्ट झाले आहे. यानंतर अर्जांची मतमोजणी होईल, अशी माहिती छाननी होऊन ४ ऑगस्ट रोजी निवडणूक विभागाने दिली आहे.

खामगाव तालुक्यात दोन ग्रामपंचायतीसाठी ५१ अर्ज

■ खामगाव तालुक्यात दोन ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत असून, ५१ अर्ज आले आहेत. २० जुलै अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.

■ तालुक्यातील खामगाव ग्रामीण व प्रिंप्री धनगर या दोन गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. अखेरच्या दिवसांपर्यंत खामगाव ग्रामीणमध्ये ३२, तर पित्री देशमुख येथे १९ अर्ज आले. ४ ऑगस्टला मतदान होणार असून, २२ जुलैला अर्ज मागे घेण्याच शेवटती मुदत आहे. २२ जुलैला लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.



Powered by Blogger.