प्रभारी गट शिक्षण अधिकारी मा. के.डी. भुजबळ यांची बदली रद्द करा त्यांना पुन्हा पंचायत समिती दौंड येथे रुजू करा -बहुजन मुक्ती पार्टी चे गट विकास अधिकारी दौंड यांना निवेदन
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड पंचायत समिती येथील प्रभारी गटशिक्षण अधिकारी मा. के. डी . भुजबळ यांची ७ एप्रिल २०२२ रोजी दौंड या ठिकाणी गटशिक्षण अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर ११० दिवसातच दि २६ जुलै २०२२ रोजी त्यांच्याकडील अतिरिक्त कारभार जिल्हा परिषद कडून घेण्यात आला .
भुजबळ यांनी थोड्याच कालावधी मध्ये अत्यंत पारदर्शक व निःपक्षपातीपणे कामकाज करून दौंड तालुक्यातील बोगस इंग्रजी माध्यमाच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शाळा तसेस संस्था वर कारवाई केली आहे . तसेस अनेक शाळा व संस्थांवर दंडात्मक कारवाई केली . खामगाव येथील नव इंग्लिश स्कूल ला ८० लाखाचा दंड केला आहे असा मोठा महसूल शासनाला गोळा होणार असून या धडाकेबाज कारवाई मुळे बेलगाम आणि मनमानी कारभार करणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना लगाम बसणार आहे. गटशिक्षण अधिकारी हे वेळोवेळी अनेक शाळांवर भेट देत होते त्यामुळे जिल्हा परिषद व खाजगी शिक्षण संस्था मधील कामचुकार पण करणाऱ्या काही शिक्षकावर अंकुश व वाचक बसला आहे व त्यांना कामकाजास शिस्त लागण्यास सुरवात झाली आहे.
त्यामुळे शैक्षणिक कामकाज वेळेवर व प्रामाणिक सुरु झाल्याचा आनंद पालक वर्गामध्ये व्यक्त केला जात असताना भुजबळ यांच्याकडील पदभार कडून घेण्यात आल्याने समाज माध्यमातून व अनेक वृत्तपत्रातून पालकवर्ग व नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे यामुळे आपण त्वरित श्री भुजबळ यांना दौंड पंचायत समितीच्या शिक्षण अधिकारी पदाचा पदभार पुन्हा देण्यात यावा अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने दौंड पंच्यात समितीच्या समोर लोकशाही सदनशील मार्गाने त्रीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मा. गोरख जगन्नाथ फुलारी अध्यक्ष दौड तालुका व मा. सौ पुष्पा निलेश बनकर महिला आघाडी दौंड तालुका बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने देण्यात आला आहे