Breaking News
recent

आत्ता एसटीतही करता येणार ऑनलाइन पेमेंट

प्रतिनिधी नागेश सुरंगे

   बुलडाणा राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमध्ये प्रवास करताना आता रोख पैसे नसतील तर काळजी करण्याचे कारण नाही. नव्या डिजिटल मशीनमध्ये प्रवासात ऑनलाइन पेमेंटही करता येणार आहे.जिल्ह्यातील सातही आजारांना अद्ययावत मशीन मिळाल्या आहेत. कोरोना काळात एसटीची सेवा तोटा सहन करावा लागला. कोरोना नियंत्रणात असल्याने महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवे उपक्रम अंमलात आणले जात आहेत. 

  एसटीच्या वाहकांना जवळपास १२ वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन देण्यात आल्या होत्या. परंतु या कालांतराने डोकेदुखी ठरू लागल्या. प्रवासादरम्यानच मशीन डिस्चार्ज होणे, तिकीट न निघणे, व्यवस्थित प्रिंट न होणे, अशा अडचणींमुळे वाहक आणि प्रवासीही त्रस्त झाले होते. हा त्रास दूर करण्यासाठी डिजिटल तिकीट मशीन अमलात आणली आहे.

एवढ्या आल्या डिजिटल मशीन

बुलडाणा - १८०,  चिखली - १२५,  खांमगाव - १०५, मेहकर - १८०,   मलकापूर- १००,  ज. जामोद -८५,  शेगाव - ७५


Powered by Blogger.