भारताचा 75 अमृत महोत्सव निमित्य श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालयात भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन
नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा :- श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित, श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालय येथे शुक्रवार 05 ऑगस्ट 2022 रोजी भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ याची स्थापना करण्यात आली. या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे स्थापना दिनानिमित्त व्याख्याने आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नवनिर्वाचित प्राचार्य डॉ. डी. व्ही. हांडे सर, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळगाव काळे येथील बापू मिया पटेल महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मनोहर झांबरे सर या कार्यक्रमासाठी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन विठ्ठलराव मूखमाले सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमासाठी NAAC समन्वयक, डॉ. स्मिता तराळे मॅडम कला, वाणिज्य , विज्ञान हेड कौन्सिल डॉ. अलका मानकर मॅडम परीक्षा विभागाचे संचालक प्राध्यापक महेश मुळूक यांनी भौतिकशास्त्र विभाग मंडळाच्या स्थापना मोलाचे मार्गदर्शन केले. भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्या अगोदर शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने श्री. पुंडलिक महाराज यांना विनम्र अभिवादन करून, पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाला स्थापनेला सुरुवात झाली. भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाकरिता करिता युनिट टेस्ट, असाइन्मेंट, भौतिकशास्त्राचे जनरल, भौतिकशास्त्राचे प्रात्यक्षिक, भौतिकशास्त्राचे स्टॉक रजिस्टर, भौतिकशास्त्राचे प्रात्यक्षिक मॅन्युअल या सर्व गोष्टीची तपासणी करून भौतिकशास्त्र मंडळाला विज्ञान शाखेमधून उत्कृष्ट दर्जा देण्यात आले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही. हांडे सर यांच्याकडून भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे स्थापना करण्यात आली. त्यांनी भौतिकशास्त्र विभागाच्या बी. एस. सी. च्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र मंडळाची स्थापना का करायची? आणि भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना मध्ये तुम्हाला संशोधनाबद्दल जागरूकता, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संशोधनाबद्दल जिज्ञासा, विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने भौतिकशास्त्र हा विषय समजून घेण्याकरिता आवश्यक बाब, प्राध्यापकाची सुसंवाद, विद्यापीठाच्या अविष्कारामध्ये सहभाग, विविध सेमिनार कॉम्पिटिशन मध्ये सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, विद्यार्थ्यांमधला जो राजहंस ओळखून देणे, विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओळख करून देणे, तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी जो स्पार्क भौतिकशास्त्र विभाग अंतर्गत प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना होत आहे.
विद्यार्थ्यांना या सत्रामध्ये 22 23 मध्ये कुठलीही अडचण उपलब्ध होणार नाही अतिशय मोलाचा संदेश देऊन विद्यार्थ्यांमध्ये नियमित तासिका, प्रात्यक्षिक, घटक चाचणी, विश्वास संपादन करून एक पुनश्च शाश्वती घेतली व विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयाची किमया, जागरूकता, कुतूहूल निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास धैर्य बुद्धिमत्ता कला कौशल्य या सर्व गुणांचा उजाळा करून देण्यात आला. विद्यार्थ्यांना प्राचार्य साहेब हे जणू काही साक्षात परमेश्वराची रूप दिसून येत होते. भौतिकशास्त्राची विषयाची उपयोगीता व कार्यक्षमता व दिशा लक्षात घेऊन भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाला चालना मिळाली. भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाला एक नवीन संकल्प, एक नवीन उमेद, एक नवीन सूर्यकिरण, एक नवीन संशोधनाकडे आकर्षण या सर्व बाबतची अतिशय सुरेख पद्धतीने मांडणी करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये व काळजामध्ये जागा करणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही. हांडे सर यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आलेले डॉ. मनोहर झांबरे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना बीएससी नंतर पुढे काय काय करायचे आहे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध करून देणारी संधी विद्यार्थ्यांसमोर आणून दिली. विद्यार्थ्यांना मिळणारे दोन महिन्याचा प्रकल्प स्कॉलरशिप कशी मिळवावी त्यासाठी काय करावे लागेल, याबद्दल मुलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना या सत्र 2022-23 मध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच हेड कौन्सिल डॉ. अलका मानकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना नियमित तासिका प्रात्यक्षिक करण्याकरिता उपलब्ध असणारी सुविधा व त्याचे महत्त्व पटवून दिले. परीक्षा विभाग परीक्षेचे संचालक डॉ. महेश मुळूक सरांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची गोडी व रुची निर्माण करून दिली व त्यांना चॉईस बेस क्रेडिट सिस्टीमची सुद्धा अनुभूती दिली. भौतिकशास्त्र विभागा चे विभाग प्रमुख डॉ. सचिन विठ्ठलराव मुखमाले सरांनी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना अतिशय सुरेख दिशेमध्ये मध्ये प्रस्थान व सादर केली. भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करताना सूत्रसंचालन बी. एस. सी. फायनल इयरचे विद्यार्थी अजिंक्य मापारी यांनी केले.
तसेच आभार प्रदर्शन अभिषेक कारोडे यांनी केले. सदर भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाला हजर असणारे विद्यार्थी दत्ता राजगुर, प्रतीक आव्हाड, स्वप्नील गायकवाड, खालिद सय्यद, मंगेश भातुरकर, हिवाळे, इत्यादी अनेक विद्यार्थी उत्साहाने उपस्थित होते. भौतिकशास्त्राच्या विभागाच्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्साह, आत्मविश्वास, निर्भय, मनाचा पक्का निर्धार करून, भौतिकशास्त्र विद्यार्थ्यांमध्ये युनिटी, भारताचा 75 वा अमृत महोत्सव करण्यासाठी उत्सुकता दिसून आली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण झाली. भौतिकशास्त्र हा अतिशय सरळ व सोप्या भाषेमध्ये शिकण्यासारखा विषय आहे. भौतिकशास्त्र प्रात्यक्षिक हातळण्यासाठी कला कौशल्य निर्माण करण्यात आले. उत्कृष्ट पद्धतीने लिहिलेले प्रात्यक्षिक मॅन्युअल, उद्घाटन व चांगल्या प्रकारे प्रकाशित करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात परमहंस श्री पुंडलिक महाराज, शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख , स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सुरुवातीला स्वागतगीत तसेच राष्ट्रगान सादर करून आजच्या या सोहळ्याचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डी. व्ही. हांडे सरांनी भौतिकशास्त्र अभ्यासण्याची गरज व सुव्यवस्था राखण्यासाठी भौतिक शास्त्राचे महत्व याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना अल्पोपराचा आस्वाद घेऊन त्यांच्यामध्ये एक भौतिक शक्ती निर्माण झाली. ही भौतिक शक्ती त्यांच्या आयुष्यासाठी जडणघडण व तसेच त्यांच्यामध्ये होणारी तंत्रज्ञानाची प्रासंगिकता, व्यवहारिक ज्ञान, उद्योजकता इत्यादी कलागुणांना वाव मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. हांडे सरांनी भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे कौतुक करण्यात आले.