Breaking News
recent

मायावती फेन्स क्लबतर्फे शैक्षणिक साहित्य वितरण

    सिंदेवाही - मायावती फेन्स क्लब सिंदेवाहीच्या अध्यक्षा आम्रपाली बागेसर- मेश्राम यांनी पंचायत समिती सिंदेवाही मधिल जिल्हा परिषद क्षेत्र मोहाली -वासेरा अंतर्गत नलेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेयस्तरीय आयोजित  चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते  चित्रकला वह्या व कलर बाक्स या शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वितरण करण्यात आले . यामध्ये विजेते विध्यार्थी इयत्ता चौथीचा  विद्यार्थि प्रज्वल सुभाष चांदेकर , तिसरीची विध्यार्थीनी स्वरा बबन बेटपल्लीवार ,दुसरीची विद्यार्थीनी अक्षरा अतुल लोनारे व इयत्ता  पहिलीची विध्यार्थीनी निशिकां विलास रन्दये यांचा समावेश आहे .

    यावेळी शाळा व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष खेमदेव गायकवाड ,उपाध्यक्ष सरिताताई लोणारे,ग्रा.प .सदस्य सुखदेव चौक़े ,मायाताई अगडे ,माजी पोलिस पाटील नाना गायकवाड ,वैशालीताई चांदेकर ,मोरेश्वर गायकवाड , मुख्याध्यापिका उषा बूध्ये ,शिक्षक नेत्राम इंगळकर व शिक्षण  स्वय्सेवीका भारतीताई  गायकवाड उपस्थित होते .


Powered by Blogger.