पंतप्रधान आवास योजना पासून वंचित लाभार्थ्यांचे बिडिओ यांना निवेदन.
नांदुरा:- तालुक्यातील गोसिंग तांडा येथे झोपडपट्टी वस्ती बसलेली आहे या लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. दोन अडीच वर्षे यादीत नाव येऊन अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. पंतप्रधान आवास योजना ही गोरगरीब झोपडपट्टी सर्वसामान्य लोकांसाठी लागू आहे पण गोशिंग तांडा येथील लोकांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. ग्रामपंचायत ला विचारणे केली पण समाधानी उत्तर मिळत नाही वस्तीतील लोकांनी राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे विषय सांगितला त्यावेळी तांडा येथील राष्ट्रीय बजरंग दल शाखा टीम च्या वतीने लाभार्थ्यांना सोबत घेऊन बीडिओ तसेच तहसीलदार यांना निवेदन दिले निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर लाभार्थंना सोबत घेऊन राष्ट्रीय बजरंग दल शाखा टीम कडून तहसील कार्यालय नांदुरा समोर उमोषणाला बसण्यात येइल असे निवेदनात नमूद आहे.
त्यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष जीवनसिंग राजपूतआकाश सावंतनिवेदन देताना ६५वर्षाची आजी उपस्थित होती १० वर्ष झाली आम्हाला घरकुल मिळाले नाही असे लाभार्थ्यांकडून सांगण्यात आलेविकास जाधव, बबन सावंत, मारुती सावंत शिवा चव्हाण शेषराव शिंदे मोहन सावंत भानुदास बाबर सुरेश बाबर शंकर सावंत काशिनाथ सावंत यशोदाबाई सावंत व महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते