गाडी चोरट्यांनी मोर्चा वळला बुलडाणा भाजीमंडीतून अज्ञात चोरट्याने दुचाकी केली लंपास
![]() |
बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार घटना CCTV मध्ये कैद |
सागर वानखेडे बुलडाणा
रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी बुलढाणा शहरातील मार्केट लाईन मध्ये आज सकाळी रविवार असल्याने भाजीमंडीत मोठी गर्दी राहते या गर्दीच्या फायदा घेत आदण्यात चोरटेने किरकोळ भाजीपाला विक्रेत्या चे मोटार सायकल केली लंपास शहर पोलीस ठाण्यात तक्रार
आज रविवार म्हणजेच आज बाजाराचा दिवस या बाजाराच्या दिवशी भाजी मंडित व इतरत्र बाजार करण्यासाठी गर्दी होत असते तसेच हराशीतून भाजीपाला घेऊन उदरनिर्वाह करणारे छोटे किरकोळ व्यापारी आपली उपजीविका भागवत असतात परंतु आज या छोट्या भाजीपाला विक्रेत्या व्यक्ती नामे नंदकिशोर यंगळ यांनी नेहमीप्रमाणे आपली मोटार सायकल घेऊन बाजारातून भाजीपाला घेण्यासाठी गेल्या असता
त्यांनी त्यांची मोटरसायकल एका भांड्याच्या दुकानासमोर उभी केली भाजीपाला खरेदी केल्यानंतर परत आल्यावर त्यांना त्याची मोटार सायकल तेथे आढळून आली नाही त्यांनी ज्या दुकानासमोर गाडी उभी केली होती त्या दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले होते त्यामुळे त्या दुकानदाराची त्यांनी वाट बघितली व सदर दुकानातून सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला असता एक भामट्या ने त्यांची मोटार सायकल क्रमांक mh28 164 यावर येऊन बसला व गाडीला चाबी लावण्याचा प्रयत्न करत असताना तो दिसून आला त्याने तिथून ती गाडी घेऊन पळ काढला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे.यावरून आता आपण व आपले साहित्य वाहन सुरक्षित आहोत किंवा नाही असा प्रश्न देखील जनसामान्यांमध्ये प्रश्न पडत आहे.याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही फुटेच्या आधारे या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.