आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अनिल मानकर सर सेवानिवृत्त
नांदुरा प्रतिनिधी
दिनांक 31 जुलै ला आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री अनिल जी मानकर सर हे आपल्या 34 वर्ष शिक्षक पदावर कार्यरत राहुन पर्यवेक्षक या पदावरून आपल्या 58 व्या वाढदिवसाच्या दिवशी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने राष्ट्रीय ओबीसी महासंघ, नांदुरा कुणबी समाज विकास मंडळ, कुणबी कर्मचारी सेवा संघाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक श्री रामकृष्ण ठोंबरे सर होते, याप्रसंगी श्री शांताराम जी, साबळे सर, श्री अमलकार सर ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभाताई भोपळे, संघटक अनिता ताई चौधरी, शिवछावा मावळा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सदाशिव शिरसागर सर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश संघटक विजय डवंगे,श्री गोपाल गावंडे सर यांनी सरांच्या कार्याचा व त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव आपल्या शब्दांनी व्यक्त करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नांदुरा शहर कोषाध्यक्ष श्री संतोष भाऊ बुरकले ,ब्रह्मानंद चौधरी, योगेश डांगे, देवेंद्र जयस्वाल, प्रतिभाताई भोपळे, अनिताताई चौधरी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सरांचा सत्कार केला. त्याचबरोबर कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष श्री केदार भाऊ ढोरे, श्री कराळे साहेब, श्री महाले साहेब, श्री प्रकाशजी घ्यार ,श्री गोवर्धन सपकाळ, श्री सुदाम भाऊ उगले, सौ डांगे ताई यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सरांचा सत्कार केला कुणबी कर्मचारी सेवा संघाच्या वतीने श्री बढे सर, श्री फाटे सर, श्री झाडोकार सर,श्री रविंद्र दिघे सर,श्री पद्माकर अमलकार सर साै.अमलकार ताई,श्री गोपाल गावंडे सर, सचिन वरणकार सर, भोजने सर, श्री साबळे सर, श्री उमेश भाऊ सुरडकार,श्री गजानन डांगे सर,जवंजाळ सर, यांनी सत्कार केला.
याप्रसंगी नांदुरा नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्री लाला भाऊ इंगळे, सोनू चोपडे श्री वतपाळ दादा यांनी सुद्धा सरांचा सत्कार केला आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री ठोंबरे सरांनी मानकर सरांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र आखरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश डांगे यांनी केले सत्काराला उत्तर देताना श्री मानकर सरांनी आपण आपल्या सेवाकाळात केवळ आणि केवळ आपल्या शिक्षकी कार्यात समर्पित होऊन, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे विचार राबवण्यासाठी कार्य केले या कार्यात अॅड.श्री शालिकरामजी कळस्कार साहेब, स्वर्गीय श्री नाना साहेब पाटील , श्री डवंगे सर,श्री ठोंबरे सर यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन मला माेलाचे सहकार्य देत गेले व त्यांच्याच आदर्श वर मी मार्गक्रमण केले...कार्यक्रमात मोठ्या संख्येने सामाजिक बांधव उपस्थित होते ..