चांदुर बिस्वा मंडळातील ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५०,००० रुपये अनुदान द्या
चांदुर बिस्वा चांदुर बिस्वा महसूल ता.नांदुरा मंडळामध्ये पेरणी होऊन १२ दिवसांनंतर पाऊस न आल्यामुळे व नंतर सतत २२ दिवस पाऊस चालू राहिल्यामुळे सर्व पिके जळाली असून त्या करिता ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५०,००० रुपये अनुदान देण्यात यावे या करिता अभय संतोषराव पाटील अध्यक्ष, अंबिका फाउंडेशन यांनी तहसीलदार यांना निवेदनात नमूद आहे की पेरणी होऊन पावसाचा खंड पडल्यामुळे पिके लहान राहिली आहेत .
व ५ जुलै ते २४ जुलै पर्यंत सतत पाऊस असल्यामुळे सोयाबीन,तूर,कापूस, उडीद, मुंग,तिळ ही पिके पाण्याखाली सडलेली आहे सतत पाऊस असल्यामुळे शेतामध्ये तळे साचलेली आहेत तरी सर्वे करून ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५०,००० रुपये अनुदान जाहीर करण्यात यावे यांची प्रतिलिपी जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आली असे निवेदनात नमूद आहे