दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात; दोघे दुचाकीस्वारांची प्रकृती गंभीर
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर येथून जाणार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर धरणगाव नजीक दुचाकी व ट्रकची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर वरुन दरसरखेड कडे जाणारी विना नंबर असलेली हिरो स्प्लेंडर प्लस व दसरखेड कडून मलकापूर कडे येणारा ट्रक क्रमांक ओ. डि. ओ. 2 बी. जे. 4871 यांच्यामध्ये समोरासमोर जबर धडक होऊन दुचाकीस्वार आकाश नंदू वानखेडे वय 19 वर्ष राहणार मोमिनाबाद व गणेश संतोष तळेकर वय 19 वर्ष राहणार मोमिनाबाद हे दोघे गंभीर जखमी झाले.
त्या ठिकाणी पत्रकार व स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने आकाश नंदू वानखडे याला अकोला येथे हलविण्यात आले तर गणेश संतोष हाताळकर याला बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे.