बम बम भोले च्या गजरात शिव ग्रुपची मानाची कावड संपन्न
प्रमोद हिवराळे प्रतिनिधी
नांदूराः शहरातील मागील एक तपापासून धार्मिक परंपरा जोपासत शिव ग्रुप च्या वतीने हिंदु धर्मीयांच्या पवित्र अश्या श्रावण मासाच्या तिसऱ्या सोमवारी बम बम भोले च्या गजरात , वाद्यवृदांच्या निनादात व महादेवाला अभिषेक करणाऱ्या श्रावणसरींच्या साक्षीने मोठ्या थाटात भक्तिमय वातावरणात मानाची कावड काढण्यात आली.
सर्वप्रथम नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे,युवानेते प्रणव एकडे, महेश सेठ चांडक , राहुल गोठी, पिंटूभाऊ कोलते, निलेश कोलते, संजू भाऊ टाकळकर आदी मान्यवरांच्या हस्ते महादेवाच्या प्रतिमेचे विधीवत पूजन व महाआरती करून कावड ची सुरुवात करण्यात आली भोलेनाथ चा जय घोष करत . मोठ्या उत्साहात कावड यात्रा संकट मोचन हनुमान मंदिर उमंग चौक नांदूरा येथून सुरू झाली पूर्णा नदी येथून पवित्र जल घेउन शहराच्या प्रमुख मार्गांनी परत येऊन जंगली महाराज संस्थान मंदिर येथील महादेवाच्या पिंडीला अभिषेक करून व महाआरती करून रात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी कावड यात्रेचे शहरातील प्रत्येक चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले सदर कावड यात्रेचे नियोजन शिव ग्रुप च्या वतीने निकेतन वाघमारे, श्याम भाऊ डंबेलकर, गणेश जामोदे, आकाश इंगळे, तुषार जूनगडे, सागर इंगळे, पवन तायडे, योगेश पांडव, संतोष जुनगडे, शिवा कव्हळे,गब्बर विठ्ठलानी, गुड्डू राठोड आदी शिवभक्तांसह शेकडो संख्येने शिवभक्त कावड यात्रेमध्ये सहभागी होते.