Breaking News
recent

डॉ रंगनाथन यांचे ग्रंथालय शास्त्रांत मोलाचे योगदान- गजानन डोंगरकार यांचे प्रतिपादन

अनंत झालटे यांचा सत्कार करताना संजय नेमाडे ,डोंगरकार, सारभुकन


नांदुरा प्रतिनिधी

       पद्मश्री   डॉ एस. आर. रंगनाथन यांनी आपले संपुर्ण आयुष्य ग्रंथालय शास्त्रात संशोधन करून भारतीय ग्रंथालय शास्त्रांच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. असे उद्गार विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष ग्रंथमित्र गजानन डोंगरकार यांनी काढले. दि ९ ऑगस्ट 2022 रोजी सकाळी १० वाजता विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात झालेल्या डॉ एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

           आपल्या भाषणात बोलतांना ते पुढे  म्हणाले की वाचनालयाचे वतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यास कक्षाचा अनंत सोपान झालटे यांच्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यानी अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीला लागावे व आपल्या वाचनालयाचे, गावाचे नाव काढावे.

           कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाचनालयाचे अध्यक्ष संजय नेमाडे यांनी डॉ रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले .याच कार्यक्रमात वाचनालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाचा विद्यार्थी अनंत सोपान झालटे यांनी रेल्वे भर्ती बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन रेल्वे मध्ये नोकरीला लागल्याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष संजय नेमाडे यांचे हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अभ्यासिकेचे विद्यार्थी अनंत झालटे, महेश चोपडे यांनी आपले विचार व्यक्त केले व वाचनालयाचे वतीने विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केल्याबद्दल वाचनालयाचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शनसचिव विजय सारभुकन यांनी केले.

           कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रंथपाल वृषाली आडोळकर ,लिपिक वर्षा नेमाडे व अभ्यासिकेचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Powered by Blogger.