भाजपच्या वतीने तिरंगा रॅली उत्साहात संपन्न
प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने केंद्र सरकार द्वारा संपूर्ण भारतभर हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे.हे अभियान मोठ्या उत्साहात मलकापूर शहरात राबविनार असून तिरंगा रॅलीचे आयोजनासाठी करण्यात आले होते भारत स्वतंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली असून 75 वा आजादी अमृत महोत्सव मोठ्या आनंद, हर्षउल्हासाने संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येत आहे .याच पार्श्वभूमीवर अमृत महोत्सव निमित्ताने येणाऱ्या काळात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याच अनुषंगाने मलकापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मलकापूर शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. ही तिरंगा रॅली भारतीय जनता पार्टीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त शहरातील संजय सिंह राजपूत यांच्या स्मारकावरून काढण्यात आली. ही रॅली शहरातील संजय सिंह राजपूत यांच्या स्मारकाजवळून बस स्टॅन्ड, टी पॉईंट ,हनुमान चौक व तहसील चौकातील हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून रॅलीचा समारोप पार पडला. यावेळी ह्या रॅलीसाठी सर्व शहर , जिल्हा, प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक,सगळ्या आघाड्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी ,महिला आघाडी पदाधिकारी व सदस्य, व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती हे विशेष.