संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून नवीन कार्यकारणी गठीत.
प्रतिनिधी नागेश सुरंगे
नांदुरा येथील चरखे हॉस्पिटल येथे मोठ्या उत्साहात बैठक संपन्न झाली.संत सावता महाराज संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने सर्व कार्यकारणीची बैठक घेण्यात आली या बैठकीच्या सुरवातीला संत सावता महाराजांची पूजा,अर्चा व आरती करून बैठकीला सुरवात करण्यात आली होती.
या बैठकीला अध्यक्ष स्थानी डॉ. भास्कर चरखे होते,प्रमुख मार्गदर्शक विभागीय अध्यक्ष राजेश जावरकर जिल्हा अध्यक्ष गोपाळ तायडे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास वानखेडे यांनी मार्गदर्शन केले व याच निमित्ताने जिल्हा माळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी रवी वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली व यावेळी प्रा.बंटी बावसकर,रामकृष्ण चोपडे,नारायण बोदडे, श्रीकृष्ण तायडे,किशोर राऊत,मंगेश सातव,निवृत्ती इंगळे,सुभाष गवळी,गणेश चोपडे यासह इतरही पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.