मलकापूर मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
आज दि.०१ ऑगस्ट रोजी आयोजन बुलडाणा जिल्हा कांग्रेस अनुसूचित जाति विभागाच्या वतीने व जिल्हाध्यक्ष प्रमोददादा अवसरमोल यांच्या नेतृत्वात मराठी समाज सुधारक , लोककवी , लेखक , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉम्रेड दादासाहेब रायपुरे होते. सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर कॉम्रेड दादासाहेब रायपुरे व अँड. साहेबराव मोरे साहेब यांची समायोजित भाषणे झाली. औप्रमुख उपस्थिती म्हणून साहेबराव मोरे, हाजी रशीदखान जमादार,श्यामभाऊ राठी, प्रमोद दादा अवसरमोल, राजुभाऊ वाडेकर, जावेद कुरेशी, राजुभाऊ पाटील, बंडूभाऊ चौधरी ,अनिलभाऊ जैस्वाल, झाकिर मेमन, रउफ सेठ, राजुभाऊ राऊत, युसूफ खान,ज्ञानदेव तायडे, निवृत्तीभाऊ तांबे, राजेंद्र वानखेडे, अशोकराव मराठे, अनिलभाऊ मुंधोकार, किशोरभाऊ गणबास,ईश्वर भदाले, आकाश ढोलकर, नंदू परसे, अजित फुंदे, मंगेश मख, वाजीद पत्रकार, गजानन हिवाळे,किसना क्षिरसागर,किशोर सोनोने, अभय वानखेडे, विलास सावळे व समाधान इंगळे सर आदी मान्यवर मलकापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्र संचलन राजेंद्र वानखेडे तर आभार प्रदर्शन अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष प्रमोददादा अवसरमोल यांनी केले. चहापाणी, नास्ता नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.