मलकापुरात अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा
मलकापूर प्रतिनिधी
अप्पर पोलीस अधिक्षक खामगाव यांचे पथकाची शेख अक्रम शेख गुलाब याचे पारपेठ मलकापुर येथे चालत असलेल्या वरली मटका जुगार च्या ऑफिस वर छापा आज दिनांक 11/08/2022 रोजी अप्पर पोलिस अधिक्षक खामगाव यांना माहीती मिळाली की शेख अक्रम शेख गुलाब हा त्याचे पारपेठ भागातील घरात तसेच मलकापुर शहरात 300 रु रोजाने एजंट नेमुन त्यांना वरली मटका जुगार खेळ खेळउन लोकांन कडून पैसे स्विकारुन सदर जुगार आकडे त्याचे पारपेठ येथे असलेल्या त्याच्या वरळी मटक्याच्या ऑफिस वर मोबाइल फोन द्वारे चालवत आहे . अशी खात्री लायक बातमी प्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आदेश दिल्या प्रमाने पथकातील अधिकारी पो उप नी पंकज सपकाळ पो.हे. कॉ गजानन बोरसे नापोका रघुनाथ जाधव ,ना पो का गजानन आहेर, संदिप टाकसाळ , राम धामोडे,अनिता गायकी ,यांनी अक्रम शेख याचे राहते घरावर महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे छापा टाकून वरली मटका जुगाराचा खेळ खेळवित असणारे 06 आरोपी
1.शेख अक्रम शेख गुलाब 2.शेख फारूक शेख कासम 3.शेख अहमद शेख मोहम्मद 4.दिनकर निनाजी सुरडकर 5.नीतिनसिंह रघुवीरसिंह राजपूत 6.शेख वहीद शेख हमीद 7.शेख कौसर शेख बशीर
यांना जागीच पकडले . नमुद आरोपिताकडून वरली मटका आकडे घेण्यासाठी वापरण्यात आलेले 11 मोबाईल कि.अंदाजे 23000 / तसेच वरली ,मटका जुगार खेळण्या करीता वापरलेले साहित्य , असा एकूण 31425/-रु वरली मटका जुगाराचा मुद्देमाल व वरली मटका जुगार चालविणारा मालकासह 6 आरोपी विरुद्ध कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाने मलकापुर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रस्तुत कार्यवाही पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त खामगांव यांचे आदेशा प्रमाणे पथकातील अधिकारी, अमलदार यांनी केली आहे.